Sunday, May 26, 2019

जरा ऐका ना!!!

मित्रांनो मी आज एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकलं. ते म्हणजे लिखाणाच्या . खरंतर  मला प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू मांडायला आवडते. त्यामुळे मी यासाठी लेखन हे माध्यम निवडलं. त्यानुसार मी पाहिला लेख लिहिला .तो बऱ्याच अंशी लोकांना पटला ही असावा. पण हा तर फक्त अ होता. पुढे मला तर अखंड बाराखडी गिरवायची आहे .याची जबाबदारी सुद्धा मला आहे. म्हणून ही अशीच एक दुसरी बाजू पुन्हा एकदा मांडतोय. मित्रांनो आपलं आजूबाजूचं जग इतकं फास्ट झालंय की , बाजूच्या बारीक बाकीक गोष्टी सुद्धा आपल्याला दिसत नाहीत. खरंतर चूक आपलीच आहे.दिसणार कसं? आपण प्रत्येक गोष्टीकडे धनाच्या चष्म्यातून बघतो. तोच चष्मा जर मनाचा असेल तर.या गोष्टी दिसतील.
सांगण्याचा उद्देश असा  की, आपल्याला एक खूप मोठी व्याधी जडलीये ती म्हणजे बहिरे पणाची कर्णबधिर पणाची . कारण आयुष्यात अशा काही गोष्टी असतात  ज्या आपल्याला कधी ऐकूच येत नाहीत . पण मी याच गोष्टी माझ्या दुसऱ्या  बाजूच्या गोष्टीने मांडतो माझी खात्री आहे की ही दुसरी बाजू तुम्हाला नक्की विचार करायला लावेल.
 माझ्या रोजच्या दिवसासारखा हा एक दिवस होता . मी नेहमीप्रमाणे कॉलेज ला जायला निघालो खरं तर आमचं कॉलेज 7.30 ला भरतं पण मी थोड्या उशिरा म्हणजे 11.30 ला गडाची पायरी सर करायचो . मी चालत चालत आमच्या कॉलेज जवळ आलो . तिथे काकांचा वडापाव ही एक फेमस जागा आहे. अर्थात तिथे  खाण्या साठी मुलांची गर्दी होती मला माझे काही मित्र तिथे भेटले आणि मी तिथे त्यांच्याशी गप्पा मारत बसलो. माझ्या बाजूला कॉलेज मधली अजून सुद्धा मुलं होती . त्यांनी घाई घाईत खायला मागवलं आणि आणि ते मजा  मस्करी करत खात होते. आणि मी त्यांचं निरीक्षण करत होतो. आशा वेळी एक कुत्र्याचं कुपोषित पिल्लू तिथे आलं . ते त्यांच्याकडे ओशाळवण्या नजरेने पाहू लागलं. त्याची ती नजर आणि भुकेपाई गळणारी लाळ  मला खूप काही सांगणारी होती. ते त्यांच्या पायाखाली आलं . आणि त्यांच्याकडे पाहू लागल. पण त्यांच्यापैकी कुणीही त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही शेवटी बेल चा आवाज झाला आणि ती मूल खूप घाई गडबडीत जायला निघाली.त्यांनी ते खाणं अर्धच ठेवलं ते बॅग उचलून पळत गेले . प्लेट मध्ये खाणं तसंच होतं.  आणि त्यावर त्या बिचाऱ्या पिल्लाची नजर ही तशीच होती . शेवटी ती प्लेट त्या हॉटेलवल्याने उचलली  आणि तिथेच त्या पिल्लाची आशा संपली . ते पिल्लू एकटक बघतच राहिलं. हे आपल्या कर्णबधिर पणाच पाहिलं लक्षण . त्या पिल्लाची हाक त्यांना ऐकूच गेली नाही .त्याची तळमळ , भूक, आपल्या कर्णबधिर पणामुळे  कशी ऐकू येणार नाही का?  शेवटी मीच 5 रु .चा पार्लेजी घेतला आणि त्याच्यासमोर तो खजिना खुला केला.आणि मी तिथून निघालो .कारण लेक्चर माझंही होत.
        असंच नंतर कॉलेज चे सोपस्कार पार पाडले आणि घरचा  रास्ता धरला. मी चालत चालत स्टँड वर जायला निघालो . तिथे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने समोरूम एक बाबा आपल्या लहान  मुलाला घेऊन चालला होता. त्याच बाजूला शेजारी एक खेळण्याच दुकान होतं.  त्याच्या बाहेर असंख्य खेळणी लावली होती.  त्या लहान मुलांची नजर पटकन त्या खेळण्यावर गेली आणि ते मुलं .बाबाकडे हट्ट करू लागल. प्रत्येक पावलागणिक त्याचा हा हट्ट वाढत जात होता. बाबा मला हे हवंय मला द्या  म्हणून ते मुलं रडायला लागलं. जिवाच्या धडपडीने ते सांगायचा प्रयत्न करत होत.  पण नंतर आश्चर्याची गोष्ट अशी की .ते बाबा कुठलाही प्रतिसाद न देतो . त्याचा हात धरून पुढे चालत राहिले. जणू काही त्यांना काही ऐकूच गेलं नाही. तेव्हा ते सुद्धा कर्णबधिर झाले .असतील. कदाचित त्यांना परिस्थिती ने जबाबदारी ने कर्णबधिर केलं असावं.म्हणून त्यांना त्या जीवाची हाक ऐकू गेली नसेल. मला चटकन माझ्या वडिलांची आठवण झाली. माझ्या विचारांचं चक्र सुरू ठेवत मी   चालत राहिलो .नंतर घरी जाण्यासाठी बस पकडली. मी बस मधून जात होतो .मी खिडकीजवळ बसलो होतो . बस .jk फाईल TRP च्या पुढे आली.आणि पुढे ट्राफिक  मुळे थांबली . प्रचंड ऊन होत.त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती .  त्या कडक उन्हाच्या झळा सावरत माझी  नजर  खिडकीतून रस्त्याच्या कडेला कांद्याची पोटी विकणाऱ्या कुटुंबाकडे गेली आणि स्तब्ध झाली. तो माणूस आणि त्याची लहान मूल भर उन्हात डोक्यावर काहीही सावली नसतात .आपला माल विकतोय. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला विकत घेण्यासाठी विनवणी करतोय  पण आत्ता ही तेच त्याच्या समोरून फक्त माणस चालत होती .कुणीही त्याच्या हाकेला उत्तर दिलं नाही . इव्हन बघितलं सुद्धा नाही .कदाचित. त्याच्या कर्णबधिर कानांना ही हाक ऐकूच आली नसेल. प्रत्येक जण इकडे तिकडे विनाकारण हजारो रुपये उडवतो. पण त्याच 100 रु. च पोत विकत घेतल  तर टोमणे सुरू होतात. कशाला घेतलंस? खूप महाग आहे आता खराब झाले तर काय करायचं . हे सगळं ऐकल्यापेक्षा न एकूण पुढे गेलेलं बरं नाही का?  याच कर्णबधिर कानांना त्याची हाक ऐकू येणार आहे का!!!!
      शेवटी बस विचारांच्या प्रवाहात माझ्या स्टॉप जवळ पोहचली आणि मी उतरलो. उतरल्यावर घरी जाण्याआधी  म्हटलं थोडा वेळ झाडाखाली उभं राहूया!! मी स्टॉप वरच्या झाडाखाली बसून राहिलो.  त्याच्या बरोबर समोर काही दुकानं होती . आणि त्यातल्या एका दुकानासमोर  दोन बोकडाची लहान पिल्लं बांधली होती . ती मजेने चारा खात होती .आणि एकमेकांसोबत खूप प्रेमाने खेळत होती. ते बघून मलाही   गम्मत वाटली. पण नंतर  थोडी वर नजर गेल्यावर समजलं ते एक मटण सेंटर आहे. थोड्या वेळाने एक  माणूस त्यातून बाहेर आला आणि त्याची पावलं त्या दोन पिल्लांसमोर थांबली .त्याने त्यातल्या एकाची दोरी सोडली  आणि उचललं .  आणि काही कळायच्या आत तो माणूस त्याला आत घेऊन गेला.  एवढं बघून माझं मन पिळवटून निघालं. त्याच्या त्या ओरडण्याच्या हाका माझ्या मनाचे असंख्य तुकडे करणाऱ्या होत्या. शेवटी त्या माणसाने दरवाजा बंद केला . आणि मी माझे डोळे. त्याच्या ओरडण्याचा आवाज वाढत गेला  तो माझ्या कानांवर सारखा पडत होता.कारण माझे कान बंद नव्हते. शेवटी त्याच्या प्रचंड किंचाळीबरोबर त्याचा आवाज शांत झाला. मी जागे वरून उठलो. सगळं सुन्न झाले. शेवटी त्या खोलीतून एक रक्ताचा ओघळ वाहत वाहत  त्या दुसऱ्या पिल्लाच्या पायाशी आला.ते पिल्लू ही माझ्यासारख सुन्न झाल .आणि मनाविरुद्ध त्याने आणि मी कर्णबधिर पणाच सोंग घेतलं. पण ज्याने त्या लहान पिल्लाला निर्दयी पणे ओढत नेलं तो पहिला कर्णबधिर होता.कारण त्याने त्याच्या किंचाळ्या मनापासून ऐकल्या असत्या  तर कदाचित त्याच ही हृदय विरघळल असत. मी ही कर्णबधिर झालो. तेव्हा अस खूप वाटलं  पैसे देऊन त्याचा जीव मला वाचवता आला असता. पण माझा खिसा पार्लेजी चा पुडा घेऊन केव्हाच रिकामा झाला होता.मग मी ही कर्णबधीर होऊन माझा रस्ता धरला.
       मित्रांनो अजून काही बोलण्याची अवशकता नाहीये,  मी हा दिवस कधीही विसरू शकत नाही , पण ही दुसरी बाजू तुम्हाला नक्कीच समजली असेल ना!!!  प्रत्येकाला ही व्याधी जडली आहे. या हाका कुणाला ऐकूच जातनाहींत. कशा जाणार प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय .पण  कितीही धन मिळावा तुमचं मन जेव्हा  हाक ऐकेल ना तेव्हा  तुमच्या हृदयावर सुद्धा  एक हसणारी कळी खुलेल.  मित्रांनो तेव्हा आशा हाका ऐकलं ना.आपल्याला ही कर्णबधिरत्वाची व्याधी दूर करायची आहे.तेव्हा पहिली हाक आपल्या मनाला घाला .आणि हो।      " जरा ऐका ना" !!!!!

Sunday, May 19, 2019

"ती "ची ति पहिली वेळ...

                  ती " ची पहिली वेळ .......

खरं तर बऱ्याच कालखंडानंतर पाहिल्यांना लिखाणाचं शस्त्र हातात घेतलं . मग लिहिण्या आधी  प्रश्न पडला की नेमकं कशावर लिहायचं बरं ? विचार आला कॉलेज मधल्या प्रेमासाठी असुसलेल्या प्रेमवेड्या मुलांवर लिहावं ? आयुष्यापेक्षा मार्कंना सिरीयस घेणाऱ्या अभ्यासू मुलांबद्दल ?  मुलींपेक्षा जास्त भाव खाणाऱ्या  कॅडबरीवर लिहावं की   आशा मुलींच्या एका साध्या लूक ने  ,हीच आपल्या आयुष्याची साथीदार आशा गोड भयंकर गैरसमजात  वावरणाऱ्या भोळ्या मित्रांवर . पण नंतर म्हटलं जरा वेगळी बाजू मांडुन बघूया . नाण्याची एक बाजू सगळेच बघतात पण लोक  दुसऱ्या बाजूने विचार करायला थोडा आळशी पणा करतात मला तीच दुसरी बाजू कायम सोप्या शब्दात मांडायला आवडते.
     मी FY ला आल्या पासून जेव्हा माझ्या मित्रांसोबत एकत्र असतो . तेव्हा 3 वर्षात  अनेकदा हा विषय येतो तो म्हणजे "ती "चा . आणि "ती " अशी नव्हती रे . खरं तर प्रत्येक भेटीत कुणाच्या ना कुणाच्या ओठावर हे वाक्य येतंच. चर्चेचा विषय पार IPL पासून सुरू होऊन हिरोशिमा नागासाकी पर्यंत जाऊन हिंडून आला तरी शेवटी येतो "ती" च्या वर. खरं तर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात "ती" चं महत्व अनन्य साधारण आहे.  तिच्या काळजी ने तो तिच्या पावित्र्याचे दाखले सगळ्यांसमोर देत असतो . हीच कदाचित मुलांमधली खंत असावी.  मी जेव्हा माझ्या मित्रांबरोबर गप्पा मारतो . तेव्हा सगळे माझ्याकडे एक एक भयंकर असे प्रश्न घेऊन येतात , ते प्रश्न म्हणजे "ती" Fy ला कॉलेज ला आली तेव्हा खूप साधी होती अगदी कुणाशी बोलायची नाही ,नंतर इतकी कशी बदलली ? एवढी वाया कशी गेली ? तिची अक्कल कुठे गेलेली? त्याने तिची पूर्ण वाट लावली ! तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. असे प्रश्नांचे भडिमार होतात. मग या सगळ्यांना उत्तर देणे तर आपले परम कर्तव्य आहे. त्या शिवाय त्यांच्या  बिचारांच्या जीवाला शांतता कशी मिळणार?
  खरं पूर्वी पासून माझं आयुष्य रंगमंचाशीच  निगडित आहे. आणि माझे  बहुतांशी मित्र  सुद्धा याच क्षेत्रातले आहेत. याच्या मुळेच माझ्यासोबत  आहेत. मग म्हटलं एवढ्या गहन विषयाची उकल रंगमंचाच्या माध्यमातून करू नाही का!!  खरं तर कुठलीही मुलगी वाईट नसते पण तीच आजूबाजूचं वातावरण "ती"ला बदलायला भाग पाडत . हेही खरं.  याची उकल करताना पडदा उघडून रंगमंचाकडे वळू.
ज्याने त्याने आयुष्यात पहिल्यांदा स्टेज वर पाऊल ठेवलंय  त्या प्रत्येकाला माझा प्रश्न आहे। की तुमचं पाहिलं सादरीकरण  होण्याच्या 5 मिनिटे आधी स्टेज वर पाउल ठेवण्या आधी तुमची मानसिकता कशी होती??  पोटात प्रचंड गोळा येत होता ना? खूप भीती वाटत होती हातपाय थरथरत होते? बापरे मी हे वाक्य चुकले तर लोक काय म्हणतील ? माझ्यावर हसतील का? असे प्रचंड प्रश्न येत होते ना? मग शेवटी स्टेज वर पाहिलं पाऊल पडतं . आणि सादरीकरण करताना सगळी ती भीती संपते . प्रयोग सुखरूप पार पडतो नंतर जीवाला खूप समाधान मिळतं. जीव शांत होतो . आता कणभर कॉन्फिडन्स अजून वाढलेला असतो .मग दुसऱ्या प्रयोगाची वेळ येते , त्यावेळी  सुद्धा पोटात गोळा येतो  , लोकांची भीती वाटते ।पहिल्या वेळी तर वाचलो दुसऱ्या वेळी आपण चुकलो तर ? पण पहिल्या वेळेपेक्षा  थोडी कमी भीती वाटते . मग तो ही प्रयोग यशस्वी होतो. त्यानंतर ही जीवाला आंतरिक समाधान मिळतं. मग तिसऱ्या प्रयोगाला तीच भीती कमी होते जगाची परवा तेव्हा कमी सतावते . पुढे जसजसे प्रयोग होत जातात तशी आपली भीती कमी कमी होत जाते. शेवटी अशी वेळ येते की दिग्दर्शकाला स्वतःहून सांगतो .चल रेडी आहे काय ते सुरू कर ।  बेल दे. आशा भीती आणि भावना शून्य अविर्भावात आपण चटकन बोलतो . तेव्हा काहीही वाटत नसत.शरीर फक्त मेकॅनिकली काम करत असत.  भावना बोथट होतात.
याचाच संदर्भ माझ्यामते "ती "च्या पहिल्या वेळेपासून जोडता येईल . ज्या व्यक्तीच्या आहारी ती गेलेली असते  त्याच तिच्या पेक्षा तिच्या शरीरावर जास्त प्रेम असत . आणि यातूनच तिची पहिली वेळ येते . तिला त्यावेळी प्रचंड भीती वाटते .लोकांची ,स्वतःची . अगदी मोठे विचार येतात ।मग मी प्रेग्नंट वैगेरे झाले तर? अस झालं तर तस झालं तर? पण नंतर प्रयोग सादर होतो.. हा प्रयोग तिच्या चारित्र्याशी केलेला असतो. त्यानंतर त्याला समाधान मिळतं.  मग ही मालिका पुढे सुरू होते ." ती" च्या दुसऱ्या वेळी सुद्धा तिला खूप भीती वाटत असते पण दिग्दर्शक हा चलाख पणे तिची समजूत काढण्यात यशस्वी होतो. आणि थोड्या कमी भीतीने दुसरा प्रयोग ही यशस्वी होतो .पुढे तिलाही याची सवय होते आवड निर्माण होते .शेवटी अशी वेळ येते की तिच्या भावना पूर्णपणे संपुष्टात येतात. उरत ते फक्त शरीर.तिला काहीही वाटत नाही . सारखा दिखाव्याचा मेक अप लावून  त्याच ही तेज कमी होत.यात मात्र विजयी झालेला असतो एक व्यक्ती तो म्हणजे "ती"ला पहिल्यांदाकाम करण्यासाठी  भाग पडणारा दिग्दर्शक .. शरीराचा उपभोग घेऊन भावनेचा खून करणारा  व्यक्ती. यही सब गेम चेंज करता है ।माझ्या या उदाहरणावरून सुज्ञ मुलांना नक्की  चांगल्या पद्धतीने समजण्यासारख आहे. गल्ली गल्लीतली फालतू नाटकं करण्यापेक्षा एकदाच आदर्श नटसम्राट करा. माझं नाटकावर प्रचंड प्रेम आहे. म्हणून या माध्यमातून मी हे उदाहरण दिलंय. यातुम त्याला कमी लेखण्याचा उद्देश नाही ।पण हे माध्यम मला दुसरी बाजू मांडण्यासाठी सक्षम वाटलं . आणि हे लिखाण संपूर्ण स्त्री विषयी नाहीये .फक्त"ती " च्या विषयी आहे. जी की तिच्या विषयी खूप तळमळ वाटते. " ती "च्या विषयी आहे तिची ही पहिली वेळ नको येऊ देत अस वाटत.माझं फक्त एकच सांगणं आहे आणि हे अत्यंत महत्वाच आहे.मुलींनो  नाटकात आणि आयुष्यात  दिग्दर्शकाला आणि प्रचंड महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाची निवड ही विचार करून करा. दिग्दर्शक आपली वाट लावू ही शकतो आणि दाखवू ही शकतो...मी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून काम करेन पण एक आदर्श वाट दाखवणारा "तो" दिग्दर्शक फक्त"ती"च्या साठी. त्यामुळे दिग्दर्शकचा विचार नक्की करा.