Tuesday, July 9, 2019

वेळेची पहिली वेळ !!!!!!!

Hiii friends , आज पुन्हा हा लेखनाचा इंद्रधनुष्य पेलतोय ,आज हा माझा तिसरा लेख खरंतर आज ही एका गोष्टीची दुसरी बाजू मांडणार आहे.
मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ ही खूप महत्त्वाची असते . काहीजण ती कटाक्षाने पाळतात तर काही जण तिची आयुष्यात येण्यासाठी वाट पाहतात. काहीजण तिची दुसऱ्यांच्या आयुष्यात येण्यासाठी वाट पाहतात.एक दिवस याच्यावर सुद्धा ही वेळ येईल या सूड बुद्धी ने . अशी ही वेळ .
माझ्या बाबतीत म्हणाल तर माझ्या बाबतीत सगळ्यांचा हाच सूर कायम असतो की हा माणूस कधीही वेळ पाळत नाही . वेळेची काहीही पडलेली नाही . कधीही येतो . असं सहसा प्रत्येक वेळी होतं . आणि माझ्या जवळच्या व्यक्तींनी ते अनुभवलं असेल . खरंतर मी काही अंशी सुद्धा मान्य करेन की मी त्या बाबतीत थोडा कच्चा आहे. पण याच वेळेविषयी मला वेळोवेळी आपुलकी वाटत गेली .म्हणूनच मी आज या वेळेची दुसरी बाजू मांडतो.
हा माझ्या रोजच्या दिवसा सारखाच दिवस होता . आमच्या कॉलेज ला परवा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम होता ज्या साठी कॉलेज ने वर्षभर खूप कष्ट व पैसे खर्च केले यावरून त्याच गांभीर्य लक्षात येत असेल. त्या साठी मी सुद्धा मुंबईतून खास त्या करिता आलो .  सकाळी मी कॉलेज ला गेलो . सर्वांना खूप टेंशन होत .मी गपचूप आमच्या ऑडिटोरिअम गेलो . आणि मला अचानक समजलं की तुला आता मिमिक्री करायचीय ते ही हिंदी मधून . हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यासमोर अख्खा हिंद महासागर उभा राहिला . अचानक सांगितल्या मुळे मी पूर्ण भीतीने खचलो माझी मनस्थिती अजिबात  ठीक नव्हती आणि त्यात माझ्या सादरीकरणाची 2 मिनिटा वरून 8 min झाली. मग मनाला समजावत मी तो परफॉर्म केला . सरांनी आणि मित्रांनी खूप धैर्य दिल.तो माझ्यालेखी  फेल ठरला .करण मी अपेक्षेला अजिबात खरा उतरलो नाही . मी स्टेज वर शेवटचा  धन्यवाद केला आणि विंगेत बसून डोळे मिटले .अजून मनस्थिती खराब झालीहोतो . आणि प्रत्येकाचे चेहरे डोळ्यासमोर यायला लागले .कारण अनेक जणांना मी एक कारण दिल होतं की जे कायम माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उठवतात .मला माहिती होत की माझी क्षमता ही नाहीये पण वेळ ती होतो मी तिला स्वीकारलं आणि कुणाशीही न बोलता शांत डोळे मिटले . तिथून एकटाच बाहेर पडलो न सांगता .सोबत माझा जवळचा मित्र देखील होता. सगळे वर अत्यंत आनंदी होते कारण तो कार्यक्रम अत्यंत मस्त झाला. याच मला सुद्धा समाधान होतं पण मनात ती एक सल मात्र होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती अख्ख कॉलेज वरती सेलिब्रेशन करत होत.आणि एकटा गेट जवळ फिरत होतो .मनाशी सहज म्हटलं चला कॉलेज ची भांडी घासूया म्हणजे तसा वाक्प्रचार आहे माझ्याबाबतीत याचा अर्थ असा की  कॉलेज मधली काम करणे कारण तीच मी 3 वर्ष करत आलो . तेवढ्यात माझ्या पिलणकर मॅडम अत्यंत व्याकुळ पणे माझ्याजवळ आल्या खर तर त्या माझ्या मॅडम कमी आणि माझी मैत्रीणच जास्त होती . त्या म्हणाल्या शैल्या बाबा वेळेवर आलास ,अरे वरती सगळ्यांना खायला द्यायचंय त्याचे   बॉक्स बाजूला ठेवलेत आणि कुणीच फोन उचलत नाहीये मी एकटी काय करू समजत नाहीये सर ओरडतील. मी काही न सांगता हसून कामाला लागलो कारण त्यांची तळमळ मी ही एकेकाळी अनुभवली आहे. मग मी आणि देवा ने सगळ्यांना वरती खाऊ पोचवला . Mam नि नेहमीप्रमाणे हक्काने  खडे बोल सुनावले आणि तितकंच कौतुक देखील केलं . नंतर मी तसाच बाहेर घुटमळत राहिलो करण मॅडम ने अजून दोन लिटर तेल टाकलं .त्या म्हणाल्या शैल्या गोंधळालास ना नेहमी प्रमाणे नाही झाला परफॉर्म.
 मग मी गेट वर होतो तेवढ्यात धावत धावत काही मुलं खाली आली मी म्हटलं काय झालं रे . त्यातला एकजण म्हणाला की अरे दादा याला आत्ताच रक्ताची उलटी झाली आणि हा बेशुद्ध होता स्वतःला आत लॉक केलेलं . डॉक्टर कडे न्यायला हवं. मग लगेच काहीही न बघता त्याला डॉक्टर कडे घेऊन गेलो .करण त्यात कुणीही मोठं नव्हतं सगळे बिचारे लहान होते .आणि सेलिब्रेशन च्या नादात त्याच्याकडे बहुतेक कुणाचं लक्षच गेलं नसेल. मीच त्यात एक मोठा म्हणून मी दवाखान्यात गेलो .
आणि इथून खरी घटना सुरू झाली .
तिथे त्याला ऍडमिट केलं .त्याला चार प्रेमाच्या शिव्या दिल्या  आणि पोत भर कॉन्फिडन्स दिला. अजून तिथे डॉक्टर आले नव्हते आम्ही वाट बघत होतो. केसपेपर वैगेरे सगळं झालं आणि मी त्या गडबडीत डॉक्टर येण्याची वाट पाहत गेट समोर घिरट्या मारत होतो. थोड्यावेळाने भर पावसात धावत पळत  तिथे एक मुस्लिम महिला  तिच्या बाळाला घेऊन रडत रडत   त्या गेट जवळ पोहचली मला कळायला काही मार्गच नव्हता .ती आली आणि हुंदके देत सांगू लागली डॉक्टर मेरे बच्चे को देखो ना प्लीज  बहोत दर्द कर रहा है । मी म्हटलं नेमकं काय झालं  थोडा जवळ गेलो तर दिसलं त्या बिचाऱ्या बाळाच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होत .आणि त्याच्या मागे एक भलीमोठी खोक पडली होती . इतकंच की त्याच्या केसांच्या आणि त्याच्या आईच्या काळ्या बुरख्या मुळे ते मला लगेच दिसलं नाही  मी अक्षरशः हललो. इतक्या सुंदर गोंडस बाळाच्या त्या किंचाळया माझ्या काळजाला छेदून जात होत्या. पण त्या वेदना फक्त मलाच जाणवल्या असतील बहुतेक करण तिकडचा प्रत्येकजण आपापल्या पेशंट जवळ होता त्याची काळजी घेत.खुशाल बघत होता मी त्या नर्स ला बोलावलं म्हटलं आमचं राहुद्या बाजूला आधी तिकडे बघा . त्या  नॉर्मल पणे तिथे गेल्या आणि फक्त त्यांनी साधारण नजर टाकून मला स सांगितलं "अजून डॉक्टर आलेले नाहीत" तुम्ही बसा बाहेर ,बघू .मला अत्यंत आश्चर्य वाटलं .मग मी त्याच्याजवळ गेलो तर एक पेच प्रसंग .. त्या आई ने मला डॉक्टर समजलं करण मी अगदी पांढरा शुभ्र शर्ट घालून परफॉर्म ला आलो होतो .ती चटकन म्हणली साब मेरे बच्चे को लगा है। कुछ करो ना ।  बापरे म्हटलं मी डॉक्टर नाहीये आता कस सांगू की अजून डॉक्टर आलेले नाहीयेत हे शब्दच मी सांगू शकलो नाही . त्याच रडणं सुरूच होत .आणि ते ऐकून एका आईच मन निश्चितच शांत नाही राहणार ती आई स्वतःला  आणि त्याला आवरत हुंदके देत त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत होती. ती जवळ जवळ बेशुद्ध पडली शेवटी मी माझ्या दोन हातांनी त्याला जवळ घेतलं आणि सगळं रक्त माझ्या तळहातांना लागलं माझे हात रक्ताने माखले. त्याच रडणं थांबतच नव्हतं तरीही त्या माऊली ने त्याला जवळ घेतलं .मग माझ्याकडे कौस्तुभ चा फोन होता चुकून आणलेला .मी तो लगेच उघडला आणि कार्टून लावलं .तरीही वेदना कमी नव्हत्या तेवढ्यात माझे मित्र मैत्रिणी  तिथे आले मग मी लगेच एकाला ला सांगितलं  लवकर एक  मोठं चॉकलेट घेऊन ये  दोघी मैत्रिणींना सांगितलं की त्याच्या आई जवळ थांबा .पण मी काहीच करू शकत नव्हतो नंतर चॉकलेट्स आणले पण त्या लहान जिवाच्या अक्रोशापुढे ते ही हतबल झाले मी हात धुतले तरीही डाग तसेच होते . त्या नर्स नि एक कापसाचा तुकडा दिलेला .
शेवटी डॉक्टर आले मी भेटलो आणि माझी ओळख दिली .म्हटलं आधी इकडे बघा मी भेटायला आत गेलो आणि ते सगळे बाहेर होते .बहुतेक तेवढ्यात त्यांचे नातेवाईक तिथे आले .आणि मी गर्दीतून बाहेर आलो  त्यांना बोलावण्यासाठी .आणि बघितलंतर ते कुठेच दिसत नाहीत मी बघितलं पण त्यांचा शोधच लागला नाही .डाँक्टर नि मला विचारलं कुठे आहे पेशंट.तेव्हा नर्स मॅडम स्मित हास्य करून म्हणाल्या बहुतेक बाहेर नेलं असेल त्यांनी नातेवाईक आले होते. विषय तिकडेच मोडला. आणि प्रत्येकजण आपल्या कामाला लागला .
    आता सर्वात मोठा विषय यात चूक कोणाची ? हो ना?  सरळ बोटं उठलं डॉक्टर वर आणि प्रशासनावर पण ही सगळी गम्मत वेळेची आहे. आता ही दुसरी बाजू बघूया . प्रत्येक जण म्हणाला असेल डॉक्टर चा निष्काळजी पणा पण खरं तर त्याची एक येण्याची वेळ ही ठरलेली असते आणि तो तर प्रामाणिकपणे त्याच्या वेळे नुसार आला .त्याने वेळ पाळली ना .काहीही असलं तरी आपल्या कामाच्या वेळेतच तो काम करणार ना.
दुसरा निशाणा आला असेल नर्स वर पण यात तिचं काय?  हॉस्पिटलमध्ये रोज हजारो पेशंट येतात कुणकुणाकडे लक्ष देणार शेवटी तिला सुद्धा वेळेवर घरी जायचं असतं ना !! त्यामुळे ड्युटी च्या वेळी ड्युटी नंतर घरी वेळ. 
यात उरलो मी आणि ती आई. जी तिच्या बाळाला वेळेवर उपचार मिळण्यासाठी वणवण फिरत होती कारण ती वेळ  तिच्यासाठी खूप महत्त्वाची होती .
आणि दुसरा मी जो कधीही वेळेचा विचार न करणारा आज वेळेशी गप्पा मारत होता.
सांगायचं इतकंच . आयुष्यात सगळे मला सांगतात की वेळ पाळत जा . पण अशी माणसचं माझ्या मनात थोडी दूषित झाली . कारण मला अशी वेळ पाळायची नाहीये . मला तर अशी वेळ कायम पाळायला आवडेल .जी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी गेल्यावर धीर आणेल. भावा वेळेवर आलास ,अशी वेळ जी सांगेल भावा त्या वेळी तू नसतास तर काय झालं असतं!!!  अशी वेळ मला त्या वेळी mam नि सांगितली शैल्या वेळेवर आलास  मला काही सुचत नव्हतं . अशी वेळ जी मला अपयशाच्या पायरीवर सांगते की तुझा ही एक दिवस आहे वेळेची वाट बघ. मी अशी वेळ नेहमी पाळतो .म्हणजे नशिबाने इतरांच्या आयुष्यात माझ्या रूपाने किव्वा इतर प्रकारे ती आपोआप पाळली जाते .फक्त मनाचं बॉंडिंग हवं .
आता काही जण अस देखील म्हणतील मग मग  वेळेवर यायची वेळ पाळायला नको का? मी म्हणेन पाळा ना  पण इतकी नका  की आपल्या वेळे पुढे इतरांच्या भावना दिसणार नाहीत . अशी माणसं फक्त रोबोट सारखी वेळ पाळतात आणि स्वतःला  प्रामाणिक म्हणतात . मित्रांनो काम तर होतचं राहत हो तुम्ही तशी वेळ नक्की पाळा पण मी फक्त ही वेळेची दुसरी बाजू दाखवली . कारण कुणावर कधी कशी  वेळ येईल सांगता येत नाही फक्त त्या क्षणी आपल्या पहिल्या बाजूचा वेळ बाजूला ठेऊनया दुसऱ्या बाजूचा वेळ दुसऱ्याला द्या . तो ही म्हणेल अगदी वेळेवर आलास !!!  मी ही वेळ कायम पाळतो या प्रसंगातून समाधान इतकंच वाटलं की ज्या माझ्या मित्राला नयन ला रक्ताची उलटी झाली तो सुखरूप आहे आणि त्याने मला पहिला मेसेज केला . दादा अशा वेळी तू होतास म्हणून मी ठीक आहे .असाच वेळोवेळी मदत करु. एवढं समाधान मला मिळाल बाकी घड्याळाचा गुलाम मी नाहीये !! धन्यवाद वेळात वेळ काढून माझा लेख वाचल्या बद्दल . वेळ मिळाला तर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा .